Thursday 25 May 2017

आई


म्हणायला तर हा शब्द फक्त दोन अक्षरांचा, पण तुम्ही त्या शब्दाबद्दल किंवा त्या व्यक्तीबद्दल जेव्हळा विचार कराल, तेव्हढेच तुम्ही त्यांच्या प्रेमाच्या अपार समुद्रात डुबत रहाल.
चिंता करु नका, हा जीव घेणारा समुद्र नाही तर जीव लावणारा आहे. तुम्ही या समुद्रामध्ये जेवढे खोलवर जाल, तेवढ्याच परिपक्वतेने व कुशलतेने तुम्ही यशाचा शिखर गाठाल.
कुणी असेच नाही म्हणून गेले की,
          "आई च्या शरणात तुम्ही जेवढे झुकाल,
           बाहेरच्या जगात तुम्ही तेवढेच ऊभराल !"
या जगात कुठलीच गोष्ट स्तंभीत नाही राहात,
दिवस बदलते, वर्ष बदलते, काळ बदलते, त्या सोबत व्यक्ती बदलतो, त्याच्या गरजांची यादी सुद्धा बदलते, फक्त बदलत नाही ते आईचं प्रेम, तिची काळजी, तिचे आपलेपण, तिचा निःस्वार्थीपणा.
     १९९८ पासुन तर आजपर्यंत.. आम्ही एका शतकातून दुसर्‍या शतकात आलो.. एका दशकातून दुसर्‍या दशकात आलो.. ऐवढे वर्ष पार पडले, पण आजही तिचा तो मयाळूपणा तसाच आहे, तिचा तो प्रेमळ स्वभाव सुद्धा तसाच आहे.
मला पहिल्यांदा बघितल्यावर तिला जो आनंद झाला असेल, तो आनंद आज पण बर्‍याच क्षणी तिच्या चेहर्‍यावर उमळुन येते...
अक्षरशः डोळे भरुन येतात तो केविलवाणा चेहरा पाहून.
हो ! ती मला रागवते, चिडते, कधी मारते सुद्धा, पण त्या मध्ये कुठे ना कुठे तिचं प्रेम, तिची माझ्याबद्दलची काळजी लपलेली राहाते.
   संत ज्ञानेश्वर महाराजांनी आईचे महत्व अगदी सोप्या शब्दात वर्णीले होते की-
                "स्वामी तीन्ही जगाचा,
                 आईविणा भिखारी"
आणि खरोखरच,
हे संत सद्गुरु जे या जगात आपली किर्ती पसरवून गेले, त्यांना असे वाटते तर मग आपण तर कुठलेच नाही.
        काही दिवसापूर्वी पार पडलेल्या Mother's Day बद्दल बोलाव तर, मी एक गोष्ट लक्षात घेतली,
तो एकच दिवस आईचा असतो...
ज्या आईची वर्षभरातून एकदा सुद्धा facebook, whatsapp वर चर्चा नाही, जी आई एकदा सुद्धा त्यांच्या सोबत छायाचित्रात दिसली नाही..
त्याच आईचा photo आज (Mother's Day ला) त्यांच्या Profile Picture मध्ये दिसत आहे, तिच्याच नावाचे status आणि post update केल्या जात आहे...
वाह रे माणसा !
कधी विचार केला का?
ती तिच्या कामातून वेळ काढुन तुम्हाला वेळ देते...तुम्हाला मदत करायला व तुमचे कामं करायला ती २४ तास, ७ही दिवस व १२ ही महिने तुमच्यासाठी तत्परतेने उपलब्ध राहाते..
आणि त्याच्या परतफेडीत तुम्ही तिला काय देत आहे ?
  तो फक्त एक दिवसाचा सन्मान, एक दिवसाचं प्रेम..
  जे वास्तविकतेत, ९०% लोकांना दाखविण्यासाठी राहाते, फक्त १०% तुमचं खरं प्रेम असेल कदाचित.
        एवढे update करण्या ऐवजी, तेवढाच वैयक्तिक वेळ तिला द्या, तिला खूप छान वाटेल.. अगदी जग जिंकल्यासारखं.
            मला ताळ्या वाजवून सत्कार कराव वाटतो त्या व्यक्तीचा ज्याणे Mother's Day ची घोषणा केली..
काही नाही तर नीदान एक दिवस तरी तिला जाणवेल की,
हो ! माझं लेकरु आहे आणि त्याला आता पण माझी आठवण आहे व माझ्या ममतेची जाण आहे.
           खूप क्वचित लोकं आहेत ज्यांना त्यांच्या आईचं मरण बघण्याची संधी मिळत नाही, आणि त्यांचं खूप थोर भाग्य असेल, कदाचित..
कारण आईच्या मरणानंतर जे दुःख होते, ते शब्दात सांगणे कोणत्याच व्यक्ति साठी शक्य नाही.. आणि वर्षानुवर्ष तीचं मन दुखावल्यावर जर ती अचानक तुम्हाला सोडुन गेली तर ते दुखः त्या व्यक्ति ला सोडून कुणालाच कळणे शक्य नाही..
तेव्हा ती तुमच्या सोबत नाही राहणार,
ती गेलेली राहणार,
नजरे पलीकडे,
खूप दूर..
आदर्श शिंदे यांच्या "आई" या गाण्याचे शब्द अगदी सारखीच परिस्थीती दर्शवितात,
              " जाण्याची का तू केलीस घाई,
                तुझ्या भेटीला आलो ग आई ____(२)
                ज्ञान वैभव हे पाहण्यास माझे,
                का आई तु थांबलीस नाही...",
            हल्ली मी एका वृद्धाश्रमाला भेट दिली, त्यातल्या काही आजीं सोबत संवाद साधला.
त्यामधील एका आजीसोबत चा माझा संवाद
 मी   :  कशी आहेस आजी ?
आजी :  ठिक आहे बाबा.
मी      :  फक्त ठिक? एकदम मजेत म्हणाव,          आम्हालापण ऐकायला चांगलं वाटते.
आजी : आता एका वृद्धाश्रमातल्या म्हातारी कडून काय मजेत राहण्याची अपेक्षा करतो रे बाबा.
(विषय टाळत)
मी      : नाव काय गं तुझं ?
आजी : अनुसया
मी      : कुठली आहेस तु ?
आजी : यवतमाळ
मी      : मुलगा आहे? कि फक्त मुली ?
आजी : व्हय नं.. एक पोरगा हाय.. (आहे नं, एक मुलगा आहे)
मी     : कसा आहे? कुठे आहे ?
आजी : कुठे आहे, हे तर माहित नाही, पण जिथं कुठं असणार, चांगलाच असणार..
भेटायला तर आला नाही आजपर्यंत..
आमच्या नशिबात हेच लिहीलं असेल तर त्याला तो तरी काय करणार रे बाबा.. आमचं आयुष्य राहालच किती.. बस तो खूश आहे, तेवढच बरं.
   यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता कि आईचं मन किती निर्मल राहाते की, तिला अश्या परिस्थितीत टाकून गेलेल्या मुलाबद्दल सुद्धा ती वाईट शब्द काढू नाही शकत आहे.
      किती कठोर असेल ते मन, जे अश्या ममतेच्या सागराला एकटं सोडून गेलं.
तुम्ही तिची फक्त १% काळजी घ्या, ति तुम्हाला १९९% परत देणार.
      जेव्हा जेव्हा एक बाळ जन्माला येते, तेव्हा जन्म घेते, ती आई.
मुल झाल्यावर कुठलीही बाई एक नवीन जन्म घेते,
त्या जन्मात ती कुणाची बहिण, मुलगी व मैत्रीण असण्यापूर्वी ती एक आई असते.
        नऊ महिने ज्याला न बघता त्याची जोपासना केली, तो जीव आज तीच्या पुढे आहे.
फक्त त्या मुलाला/मुलीला बघण्याची वेळ असते,
ते प्रेम, तो मयाळुपणा, ती सद्भावना आपोआप तीच्या मनी जागते.
तेव्हा पासून तीचं आयूष्य असते, ते त्या मुलासाठी/मुलीसाठी.
हळू हळू बाळ मोठं व्हायला लागते, स्वावलंबी व्हायला लागते. त्याला बाहेरचं जग आकर्षीत करायला लागते.
       फक्त वीसर पडतो, तो आईचा.
कधी शिक्षणासाठी दूर जाव लागते, तर त्यानंतर पोटपाण्याची सोय करायला..
तेव्हा कोण तीला रोज call करुन विचारणार,
आई तु जेवलीस का ?
तेव्हा कोण तीला रोज call करुन विचारणार,
आई तुझी तब्येत ठीक आहे नं ?
तेव्हा कोण तीला रोज call करुन विचारणार,
तुला झोप येते की नाही आई ?
तेव्हा कोण तीला ऊगीच call करुन म्हणणार,
I Miss You आई..
        ती स्वतः तुम्हाला नेहमी नेहमी call नाही करु शकत, कारण तीला सुद्धा वाटते की माझ्या एका call मुळे माझ्या मुला/मुलीला office मध्ये काही problem नको व्हायला.
        तिला अपेक्षा राहाते ती फक्त झोपण्यापूर्वीच्या एका call ची, ज्यामधला धडधाकट आवाज ऐकून ती सुखाची झोप घेऊ शकणार..
    ती होती म्हणून, तूम्ही आहे...
तीची काळजी घ्या, तीचा सन्मान करा, तीचे मित्र/मैत्रीण व्हा..
फक्त Mother's Day सारख्या ऐकाच दिवस नव्हे तर पूर्ण आयूष्य तीच्यासाठी नीहाल करा..
तीला प्रेमाचे दोन शब्द तर म्हणा,
परतीत तुम्हाला अगदी प्रेमाचा खजिना मिळेल..
तीच्या मायेबद्दल काही बोलावे तर ह्या दोन ओळी उच्चारास येतात —
                  माई माऊलीची माया,
                  अनमोल काया ।
                  ऊन सावली सुखाची,
                  ममतेची छाया ।।
                  Love You Aai
It is said that, we can write about our Mother fluently & better in our Mother tongue.
So, I tried to write something in my language i.e. Marathi.
Happy reading !!
                    Thank You..!!


Hey there, thanks for following my blog all up to here at the end.

I hope y'all like it.

Please hit the FOLLOW button to get in touch with the latest blogs and writings OR follow the page on Facebook The DrunkKalam 😍


Craving for your love...

ABOUT ME  |  CONTACT ME

Happy Reading!

You might also like to read this -