Tuesday, 20 July 2021

विठ्ठल विठ्ठल जय हरी - (पंढरपूरची वारी)


अरे देवा !

प्रत्येक वर्षी वारी घेऊन जाणारे यंदा घरी बसले आहेत!

याच वर्षी नव्हे तर मागील वर्षी सुद्धा घरुनंच देवदर्शन करावे लागले होते त्यांना. 


काय मनस्थिति असेल त्या वारकरी संप्रदायची, ज्यांना बियाणे शेतीतल्या मातीत पळायच्या अगोदर ओढ़ असते, ती म्हणजे पंढरपुरची, पंढरीच्या वारीची व विठ्ठल भेटीची .

वर्षानुवर्ष त्याच रस्त्यावर स्वतःचे पाय घासत, भाकर-बेसन खाऊन, दिवस अन दिवस विठ्ठलाचे नाव मुखी स्वारून, हज़ारो नव्हे तर लाखों लोकांचे धक्के खात एक वारकरी जातो, त्या चंद्रभागेच्या तिरी विठ्ठलाच्या पायथ्याशी.

Picture Courtesy : Prathamesh Ghadekar


सम्पूर्ण भक्तिभावने त्या अभंगांमधे लीन होउंन एक वारकरी कधी ४००-५०० किलोमीटर चालून जातो, त्याला कळत सुद्धा नाही. कळत असेल जरीही, पण त्या दुःखा पुढे तिथे जाऊन माउलींच्या मुखावरचं चंदन बघून मात्र जी मनाला शांतता भेटत असेल, ह्या विचारामुळे पायावरच्या भेगांवर आणि तळपायावर आलेल्या फोडांवर लक्ष जाने जणू अशक्यच आहे.


त्यात तुम्हाला माहिती असेलच, वारकरी म्हटले की सर्व अगदी म्हातारे लोकं, म्हातारे जरी नसेल पन वयानी मोठे नक्कीच असतात. परंतु त्याच्या डोळ्यात एक खुशी असते पंढरी जाण्याची आणि त्यांच्या विठुरायला भेटण्याची, जशी एखाद्या चिमुकल्याला खुप दिवसांनी त्याच्या माय-बापाला भेटून होत असेल, तशीच खुशी.


परंतु आता पर्यंत तुम्हाला प्रश्न नाही का पड़ला ? मी हा लेख आताच का बरं लिहित आहे ? आजच का बरं ?

अनेकांना माहिती असेलच. आज आषाढ़ी एकादशी आहे. 🙏🏻


भेटायला वर्षाचे ३६५ दिवस असतात हो, पण आषाढ़ी एकादशीचं महत्व म्हणजे वेगळंच. लाखो लोकांच्या गर्दी मध्ये दर्शन जरी काही क्षणांचं असेल, परंतु ते सुख पुढील एक वर्ष हसत काढण्यासाठी पुरेसं आहे.


क्रेडिट : लोकमत


महाराष्ट्राच्या एकाच जागेहून नव्हे तर प्रत्येक मोठ-मोठ्या देवस्थानावरुन जाते एक पालखी, आणि पालखी घेऊन जाणारेच म्हणजे आपले वारकरी. यंदा लोकांना एकमेकांच दर्शन तर कमीच झालं, अन आता देवाचे सुद्धा दूरदर्शन करावे लागत आहे.

नाही हो, याचा अर्थ हा मुळीच नाही की पालखी नाही जाणार. 

पालखी नक्कीच जाते, पूर्ण थाटा-माटात, फुलांच्या साजाणे सुरूप होउंन, परंतु मोठमोठाल्या गाड्यांमधे.


देहू, आळंदी, पैठण, असे अनेक तीर्थस्थानावरुन पालख्या जातात. तशीच आमच्या शेगाँव वरुन सुद्धा. 

मला तर मागील काही वर्षांपासून फेसबुक आणि व्हाट्सएप वर लोकांनी टाकलेले छायाचित्र आणि वीडियो बघूनच थरथराट सुटतो.

काय तो लोकांचा निरागस भक्तिभाव, दैवावर असलेली श्रद्धा, की गाड़ी गावातून जात आहे माहिती पड़ताच फुल-पुष्प घेऊन रस्त्यावर तैयार.

तसाच एक वीडियो मी तुम्हाला पण दाखवू इच्छुक आहे, कदाचित तुम्ही बघितला सुद्धा असेल.

YouTube वर विडियो बघण्यासाठी येथे क्लिक करा

Instagram वर विडिओ बघण्यासाठी येथे क्लिक करा

आजकाल तर गोल-रिंगन चा प्रकार पण नाही राहाला, त्यात एक खरी वेगळीच मज्जा. काय ते घोड़े अन् काय ती लाट आणि भिड़ंत लोकांची, त्या अश्वाच्या पायाखालची देवमाती घेण्यास.


Picture Courtesy : Lokmat

 

पूर्ण मराठी बातम्यांचे मुख्य मोळ विठुरायाकडे असते, तेवढेच नव्हे तर वृत्तपत्राचे मुख्य पानावर सुद्धा आपली माऊली विटेवरी अभी दिसते.

काय तो गजर त्या टाळ, मृदंगांचा!

टाळ्यांचा व ढोलकांचा नाद करत, नाचत-गात, हरिनाम घेत पांडुरंगाच्या द्वारी पोहोचत नाही, तोपर्यंत बघत राहावे, अशी ती दिंडी असते.

फक्त हा वाइट वेळ जाऊ दे आणि पुढल्या वर्षी या वारकऱ्यांना पुन्हा तुझी भेट होऊ दे, हीच तुझ्यापायी या लेकराची प्रार्थना 🙏🏻 


.

.

.

माझा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद !

Hey there, thanks for following my blog all up to here at the end.

I hope y'all like it.

Please hit the FOLLOW button on the upper left corner to get in touch with the latest blogs and writings OR follow the page on Facebook - The DrunkKalam 😍


Craving for your love...

ABOUT ME  |  CONTACT ME

Happy Reading!

8 comments:

  1. मला वाटत नव्हतं की तु भक्तिमार्गाबद्दल पण लिहू शकतो. ��

    सुंदर लिहिलं ��

    ReplyDelete
  2. खुप खुप धन्यवाद बाबा 😃🙏🏻

    मला अपेक्षा नव्हती तुमच्या कडून कमेंट ची 😛🤭
    Thank You Again ✨

    ReplyDelete
  3. Replies
    1. धन्यवाद माउली 🤗✨

      Delete
  4. खूप सुंदर लिखाण माऊली !!!
    जय हरी विठ्ठल

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद माऊली 🙏🏻😇

      Delete

Leave us your reviews

You might also like to read this -